संस्थेचे प्रणेते
श्री.प्रल्हाद
नारायणदास राठी
हा प्रकल्प, श्री. प्रल्हाद राठींच्या भगवद्गीतेच्या अनेक वर्षांच्या वाचनातून उभारला गेला आहे. हे त्यांचे प्रयत्न आहेत ज्यात सामान्य माणसाला गीतेची तत्त्वे समजता येतील आणि त्यांचा वापर कसा करावा हे शिकवता येईल. फक्त भगवद्गीता नाही, तर पाश्चात्य तज्ञ चार्ल्स मुंगेर आणि वॉरन बफे यांनी स्पष्ट केलेली आणि अनुभवलेली तत्त्वेही गीतेच्या तत्त्वांसोबत जोडली जात आहेत. हे ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, संस्थेने विविध विषयांवर विविध पद्धतीने प्रलेखन केले आहे. आजवर अनेक शास्त्रज्ञ, तज्ञ, संशोधक इत्यादी संस्स्थेला भेट देऊन कामाचा आढावा घेत आहेत. आम्ही संस्थेच्या वतीने सर्वांना या संस्थेचा भाग होण्याचे आणि चालू कामात योगदान देण्याचे तसेच हे ज्ञान शक्य तितक्या लोकांपर्यंत पसरवण्याचे आवाहन करतो.

